Bollywood News बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या त्याच्या ‘अॅनिमल’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. रिलीजच्या चौथ्या आठवड्यातही हा चित्रपट कोटींचा व्यवसाय करत आहे. 26 दिवसांत ‘अॅनिमल’ची एकूण कमाई आता 537.97 कोटींवर पोहोचली आहे. या चित्रपटातील रणबीर कपूरच्या अभिनयाचे खूप कौतुक होत आहे. राहाने तिच्या क्यूटनेस आणि इनोसन्सने लोकांची मने जिंकली आहेत, पण याच दरम्यान असे काही घडले आहे की रणबीर कपूरला खूप ट्रोल केले जात आहे.
Jai Mata Di 😂😭 pic.twitter.com/kw7ON02pXN
— 𝙑amsi ♪ (@RKs_Tilllast) December 25, 2023
दरम्यान, कपूर कुटुंबात नुकतेच ख्रिसमस लंचचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट्ट व्यतिरिक्त संपूर्ण कपूर कुटुंब उपस्थित होते.अशात, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रणबीर कपूर ख्रिसमस केकवर वाइन ओतताना दिसत आहे. यानंतर तो प्रचंड चॉकलेट केक पेटवतो. केक पेटवताना पाहून आलिया भट घाबरलेली दिसत आहे. केक पेटवल्यानंतर रणबीर कपूरने जय माता दीचा नारा दिला. हे ऐकून तिथे उपस्थित सर्वजण हसले. व्हिडिओमध्ये कुणाल कपूर, नव्या नवेली नंदा, आधार जैन आणि जहाँ दिसत आहे.
सोशल मीडियावर रणबीर कपूरचा जय माता दीचा जयघोष लोकांना आवडला नाही. लोकांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. एका यूजरने लिहिले, ‘दारू आणि जय माता दी.. हा काय मूर्खपणा आहे?’ दुसऱ्याने लिहिले, ‘तो जय माता दी म्हणत दारू ओततोय.. आणि आम्ही अशा लोकांना आमची मूर्ती मानतो..’ अशी टिप्पणी केली, ‘रणबीर कपूर म्हणाला का? ख्रिसमस केक कापताना जय माता दी?’ असं म्हणत त्याला ट्रोल केले जात आहे.