कोरोना व्हायरसमुळे जागतिक आणिबाणी

 चीनमध्ये बाधीतांची संख्या 10 हजार

बिजिंग : कोरोना व्हायरसची साथ पसरल्याने जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक आणीबाणी जाहीर केली. चीनने शुक्रवारी मृतांची संख्या 213 वर पोहोचल्याचे जाहीर केले. तर सुमारे 10 हजार जणांना याची बाधा झाली आहे.

संयुक्त राष्ट्रेच्या जिनिव्हास्थित आरोग्य संस्थेने सुरवातीला या कोरोना विषाणूच्या साथीकडे दूर्लक्ष केले. मात्र त्याच्या पेचप्रसंगाची चर्चा सुरू झाल्यानंतर या धोक्‍याचा फेरआढावा घेतला. “”कमकुवत आरोग्य सुविधा असणाऱ्या देशांत या विषाणूंचा प्रसार होण्याची शक्‍यता ही आमच्यासाठी सर्वात मोठी धोक्‍याची घंटा आहे. हा प्रसार रोखण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र प्रयत्न केले पाहिजेत. आपण सर्वांनी त्याचा प्रसार थांबवायला हवा,” असे संघटनेचे प्रमुख टेडरोस अधानोम घेब्रेयीसस यांनी जिनिव्हात सांगितले.

टेडरोस म्हणाले, “”चीनशी व्यापारबंदी आणि प्रवासबंदी यांची गरज नाही, कारण हा विषाणू 15 देशांत पसरला आहे”. अनेक देशांनी चीनला भेट देऊ नये असे आवाहन आपल्या नागरिकांना केले आहे. तर या विषाणूंचा उगमस्थान असणाऱ्या वुहान प्रांतातून येणाऱ्या प्रवाशांना काही देशांनी प्रवेशबंदी घातली आहे.

चीनमध्ये वुहानला जाऊन आलेल्या पत्नीकडून अमेरिकडेतील एका नागरिकाला या विषाणूची बाधा झाली. अनेक विमान वाहतूल कंपन्यांनी चीनमधील आपल्या विमान फेऱ्या रद्द केल्या आहेत. इस्रायलने चीनच्या सर्व विमान फेऱ्या बंद केल्या आहेत. तर रशीयाने त्यांच्या चीनलगतच्या सीमेवरील प्रांताबाबत चिंता वाटत असल्याचे म्हटले आहे.

चीनमध्ये कडक उपाय योजना
या विषाणूंना रोखण्यासाठी चीन प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. वुहान आणि लगतच्या सुमारे 50 हजार जणांना स्वतंत्र ठेवले आहे. गुरूवारी 24 तासांत नव्याने 38 जण मृत्यूमुखी पडले. गेल्या वर्षाच्या अखेरीस हा विषाणू आढळल्या पासून ही सर्वात अधिक संख्या आहे. शुक्रवारी आणखी 43 जणांचे बळी गेल्याचे सांगण्यात येत आहे. हुबेईमध्ये दोन दिवसांत दोघांचे बळी गेले आहेत.
राष्ट्रीय आरोग्य आयोगाने नव्याने बाधा झालेल्याची संख्या एक हजार 982 असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे बाधीतांची संख्या दहा हजारच्या जवळ गेली आहे. संभाव्य लक्षणे असणाऱ्या एक लाख दोन हजार जणांना वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.

गेल्या आठवड्यात वुहानच्या सीमा सील केल्यानंतर तेथे हजारो परकीय नागरीक अडकून पडले आहेत. जपान आणि अमेरिका या देशांनी आपल्या नागरिकांना नेण्यासाठी वुहानला विमानसेवा सुरू केली आहे. ब्रिटनने 200 नागरिकांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले केले आहेत. शुक्रवारी आणि शनिवारी तेथून नागरिकांना हालवण्यासाठी फ्रान्स, ऑस्ट्रेलिया आणि न्यझिलंड तसे प्रयत्न करत आहेत. टोकियोत आलेल्या पहिल्या विमानातील तीन प्रवाशांना या विषाणूंची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.