नवी दिल्ली : देशात गेल्या काही दिवसांपासून देशात करोना रुग्णसंख्येत लक्षणीय घट दिसून येत आहे. मात्र, मृत्यूचा आलेख दिवसेंदिवस वर जातानाच दिसत असून ही सर्वांसमोरची चिंताजनक बाब आहे. भारतात, गेल्या २४ तासात करोना संक्रमणामुळे ४३२९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एका दिवसात मृत्यू झालेल्या रुग्णांची ही सर्वाधिक संख्या आहे.
आज आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासात करोनाचे २,६३,५३३ नवीन रुग्ण आढळले आहेत.
India reports 2,63,533 new #COVID19 cases, 4,22,436 discharges and 4,329 deaths in the last 24 hours, as per Union Health Ministry
Total cases: 2,52,28,996
Total discharges: 2,15,96,512
Death toll: 2,78,719
Active cases: 33,53,765Total vaccination: 18,44,53,149 pic.twitter.com/75fXkY6Xjh
— ANI (@ANI) May 18, 2021
देशात गेल्या २४ तासात २,६३,५३३ नवीन करोना रुग्ण आढळले. तर ४,२२,४३६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ४,३२९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
भारतात आतापर्यंत २,५२,२८,९९६ करोना केसेस आढळले आहेत. तर २,१५,९६,५१२ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडले आहे. २,७८,७१९ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या भारतात ३३,५३,७६५ बाधित करोना रुग्ण आहेत.