सीसीएल म्हणजेच “सेलिब्रिटी क्रिकेट लीग’ संपून काही दिवस झाले असले तरीही अभिनेता सिद्धार्थ जाधवचा एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सिद्धार्थने एक षटकार मारला होता. जो प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिला होता. तर यामुळे अनेकांना धोनीच्या षटकाराची आठवण ही झाली होती.
View this post on Instagram
सीसीएलमधून वीर मराठी या संघातून सिद्धार्थ खेळत होता. यावेळी सिद्धार्थने एक षटकार मारला होता. यानंतर अनेकांनी सिद्धार्थचे कौतुकही केले होते. वीर मराठी हा संघ अभिनेता रितेश देशमुखचा आहे.
View this post on Instagram
तर अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर हे संघाचे कर्णधार आहेत. दरम्यान, सिद्धार्थ नुकताच प्रदर्शित झालेला “राधे : युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ या चित्रपटात झळकला आहे. यातील त्याच्या कामाचीही विशेष चर्चा होत आहे. त्याने “रणजीत मवानी’ हे पात्र साकारले आहे. सिद्धार्थच्या हातात आणखी काही चित्रपट आहेत. लवकरच तो तीन नव्या चित्रपटांतही झळकणार आहे.