Odisha Train Accident – पश्चिम बंगालमधील लोक मोठ्या संख्येने उत्पन्नाच्या शोधात किंवा वैद्यकीय उपचारांसाठी दक्षिण भारतातील राज्यांमध्ये जातात. कोरोमंडल एक्स्प्रेसमध्येही रोजच्या प्रमाणे मोठ्या संख्येने प्रवासी दक्षिण भारतातील राज्यांमध्ये जात होते, पण ट्रेनमध्ये चढताना त्यांना इतका भीषण अपघात होईल, यांची कल्पना त्याने स्वप्नातही कल्पना केली नसेल. दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील सुकांत हाल्दर
हा या अपघातातून बचावलेल्या भाग्यवानांपैकी एक आहे.
सोनारपूरचे रहिवासी असलेले सुकांत हाल्दर चेन्नईतील मेट्रो प्रकल्पाच्या कामासाठी शालीमार स्थानकावरून कोरोमंडल एक्स्प्रेसच्या एस-7 डब्यातुन प्रवास होता. या अपघातातून 30 वर्षीय सुकांत थोडक्यात बचावला आहे. अपघातानंतर सुकांत हाल्दर कसातरी ट्रेनच्या वाकलेल्या डब्यातून बाहेर पडला आणि गाडीने बालासोरला पोहोचला. तेथून कोलकात्याला जाणारी बस आज सकाळी बाबूघाट येथे पोहोचली.
कोलकाता येथील बाबूघाट येथे पोहोचल्यानंतर सुकांतने अंगावर शहारे आणणारा अनुभव सांगितला. सुकांताच्या म्हणण्यानुसार, शालिमार सोडल्यानंतर ट्रेन सामान्य वेगाने धावत होती, परंतु खरगपूर ओलांडल्यानंतर काही वेळातच संध्याकाळी 6.30 च्या सुमारास अचानक बोगीतील सर्व काही जोरदार धक्क्याने उलटले आणि सीटवरून खाली पडले.
तो पुढे म्हणाला की, आधी काय झाले हे समजायला थोडा वेळ लागला, पण परिस्थिती समजल्यावर मोठा रेल्वे अपघात झाल्याचे समजले. तोपर्यंत बोगीत बसलेल्या प्रवाशांच्या किंकाळ्या सुकांतच्या कानावर पडत होत्या. आजूबाजूला रक्त वाहत होतं. अंधारात बोगीतून कसे बाहेर पडायचे हे समजत नव्हते. सुमारे अर्ध्या तासानंतर तो कसा तरी बोगीतून बाहेर पडल्याचे सुकांतने सांगितले.
सुकांतच्या कपाळावर, मानेला आणि पायाला जखमा झाल्या आहेत, या अपघातातून तो बचावला यावर त्याचा स्वःतवर विश्वास बसत नाहीये. एकामागून एक बोगी आजूबाजूला विखुरल्या गेल्या. रेल्वेचा पुढील भाग बाजूच्या मार्गावरील मालगाडीवर चढला होता असेही त्याने सांगितले.
त्याच ट्रेनमध्ये त्याच्या ओळखीचे दोन जण चढले होते, मात्र त्यांच्याबद्दल काहीच माहिती मिळाली नाही. त्यानंतर सुकांत रेल्वे रुळावरून उतरून काही अंतरावर रस्त्यावर आला, तेथून बालासोरला जाण्यासाठी छोटी गाडी घेतली.
तिथून कोलकात्याची बस पकडली. त्याने संपूर्ण घटना बस ड्रायव्हर आणि कंडक्टरला सांगितली, कारण त्याच्याकडे कोलकात्याला बसचे भाडे देण्यासाठी पैसे नव्हते, दरम्यान, बस ड्रायव्हर आणि कंडक्टर सुकांतला कोलकात्याला घेऊन जाण्यास तयार झाले. अखेर आज सकाळी सुकांत बसने बाबूघाट येथे पोहोचला. सुकांतच नाही तर कोरोमंडल एक्स्प्रेसचे अनेक प्रवासी आज पहाटे ओडिशातून बसने कोलकाता येथे पोहोचले.