दार्जिलिंग – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी त्यांच्या खास शैलीसाठी ओळखल्या जातात. कधी ती पक्ष कार्यकर्त्यांसोबत आपुलकीच्या भावातून वागताना दिसतात.
#WATCH | West Bengal CM Mamata Banerjee displayed her culinary skills as she prepared momos at a local stall in Darjeeling earlier today pic.twitter.com/rcd10keMwt
— ANI (@ANI) July 14, 2022
तर कधी फुटबॉलला लाथ मारताना त्या दिसून आल्या आहे. अलीकडेच, दार्जिलिंगमधून त्यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यात त्या एका स्थानिक स्टॉलवर बसून मोमोज तयार करताना दिसत आहे.
दरम्यान, हा व्हिडिओ एएनआय या वृत्तसंस्थेने शेअर केला असून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज दार्जिलिंगमधील एका स्थानिक स्टॉलवर मोमोज तयार करण्यात मदत केली आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, ममता बॅनर्जी यांनी मोमोजच्या स्टॉलमध्ये मोमोज बनवण्यात मदत केली आहे.’
व्हिडिओमध्ये दोन महिला मोमोज स्टॉलवर ममता बॅनर्जी पोहोचतात त्यानंतर या महिलांसोबत मिळून मोमोज बनवतात. यादरम्यानचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.