मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरचा आगामी चित्रपट ‘गुड लक जेरी’चा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा चित्रपट २९ जुलैला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर खूपच मनोरंजक दिसत आहे. जान्हवी पूर्णपणे वेगळ्या अंदाजात दिसत आहे. हा चित्रपट डिस्ने + हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट कोलामावू नाईटिंगेल (२०१८) या तमिळ चित्रपटाचा अधिकृत रिमेक आहे.
ट्रेलरमध्ये सुशांत सिंग खलनायकाच्या भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटाची निर्मिती आनंद एल राय यांनी केली असून दिग्दर्शन सिद्धार्थ सेन यांनी केले आहे. गुड लक जेरीमध्ये दीपक डोबरियाल, नीरज सूद, मीता वशिष्ठ यांच्याही भूमिका आहेत.
यापूर्वी जान्हवीने तिच्या चित्रपटाशी संबंधित पोस्टर देखील शेअर केले होते.पोस्टरमध्ये जान्हवी घाबरलेल्या हातात बंदूक धरलेली दिसत आहे. पोस्टर शेअर करताना जान्हवीने लिहिले की, ‘मी एका नवीन साहसाला निघाले आहे, शुभेच्छा देणार नाही का? गुड लक जेरी 29 जुलैपासून डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रवाहित होईल. जान्हवी कपूर यापूर्वी रुही या चित्रपटात दिसली होती. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नाही.