मुंबई – शिंदे फडणवीस सरकारने आज काही महत्वपूर्ण निर्णय जाहीर केले आहेत. ज्यामध्ये पेट्रोल ५ तर डिझेल ३ रुपयांनी स्वस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासोबतच महाविकास आघाडी सरकारने बदलेले निर्णय पुन्हा या नव्या सरकारने लागू करण्याचा निर्णय घेतल्याचे पाहायला मिळाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधत या निर्णयाबाबत माहिती दिली.
राज्यातील नगराध्यक्ष आणि ग्रामपंचायतीतून सरपंचाची निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय २०१८ मध्ये घेण्यात आला होता. परंतु राज्यात २०१९ मध्ये सत्तांतर झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने हा निर्णय बदलला. आज पुन्हा शिंदे-भाजपा सरकारने हा निर्णय पूर्ववत करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये नगराध्यक्ष आणि सरपंच थेट जनतेतून निवडले जाणार आहेत.
मंत्रिमंडळ बैठक निर्णय
गुरूवार दि. १४ जुलै २०२२ रोजीच्या बैठकीतील निर्णय संक्षिप्त स्वरूपात:– पेट्रोलवर ५ रुपये आणि डिझेलवर ३ रुपये प्रति लिटर दर कमी करण्याचा निर्णय.
( वित्त विभाग)– राज्यात "स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० अभियान" राबविण्यात येणार.
(नगर विकास विभाग)— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 14, 2022
शिंदे- फडणवीस सरकारने घेतले महत्वाचे निर्णय
पेट्रोलवर ५ रुपये आणि डिझेलवर ३ रुपये प्रति लिटर दर कमी करण्याचा निर्णय
राज्यात “स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० अभियान” राबविण्यात येणार.
केंद्र पुरस्कृत अमृत अभियान २.० (Atal Mission For Rejuvenation & Urban Transformation) राज्यात राबविणार
नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांची निवडणूक थेट पद्धतीने घेणार
राज्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचाची थेट निवडणूक घेणार. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या संबंधित कलमांमध्ये सुधारणा. अध्यक्ष, उपाध्यक्ष कालावधी तीन महिन्यांपर्यंत वाढविणार
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६९ मधील कलम ४३ मध्ये सुधारणा.
बाजार समितीतील सर्व शेतकऱ्यांना थेट मतदानाचा अधिकार.महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ मध्ये सुधारणा.
आणीबाणीच्या कालावधीत ज्या व्यक्तींना बंदिवास सोसावा लागला, अशा व्यक्तींचा सन्मान यथोचित गौरव करण्याची योजना पुन्हा सुरु करणार