WhatsApp Update : मेटा-मालकीचे व्हॉट्सअॅप एका नवीन प्रणालीवर सध्या काम करत आहे. आता व्हॉट्सअॅपचे हे फीचर सुरू झाल्यानंतर बिझनेस अकाऊंट चॅनललाही ग्रीन टिक मिळणार आहे. सध्या सेलिब्रिटी आणि इतरांच्या व्हॉट्सअॅप अकाऊंटच्या चॅनेलला ग्रीन टिक आहे.ग्रीन टिक म्हणजेच ते अकाउंट अधिकृत असल्याचे प्रमाण आहे.
ग्रीन टिकची गेल्या काही दिवसांपासून खूपच चर्चा होती. अखेर आता त्याबाबतची महत्वाची अपडेट समोर आली आहे. व्हॉट्सअॅपच्या या फीचरची सध्या बीटा व्हर्जनवर चाचणी सुरू आहे. WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, नवीन फीचरला “व्हेरिफाईड चॅनल” असे नाव देण्यात आले आहे आणि ते अँड्रॉईड बीटा व्हर्जन 2.24.1.18 वर टेस्ट केले जात आहे.
व्हॉट्सअॅप बिझनेसच्या या नव्या फीचरचा स्क्रीनशॉटही समोर आला आहे. गेल्या वर्षी व्हॉट्सअॅपने म्हटले होते की, व्यवसाय व्हॉट्सअॅपवर त्यांच्या मेटा (फेसबुक आणि इंस्टाग्राम) व्हेरिफिकेशनची सदस्यता घेऊ शकतील.बिजनेस चॅनेलवर पडताळणीसाठी, युजर्सना Meta Verified चे सदस्यत्व घ्यावे लागेल, म्हणजेच ते विनामूल्य नसेल.
व्हॉट्सअॅपने बिजनेस प्रणाली सुरु करून जगभरातील अनेक छोट्या मोठ्या व्यवसायिकांना चांगले माध्यम उपलब्ध करून दिले. त्यामुळे व्हॉट्सअॅप युजर्सची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली देखील. आता याच युजर्सना अधिकृत टिक लवकरच घेता येणार आहे. मात्र यासाठी युजर्सना पैसे मोजावे लागणार असल्याचे समजते. त्याबाबतची माहिती व्हॉट्सअॅप लवकरच आपल्या अपडेटद्वारे देणार आहे.