नवीन वर्षात व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनसाठी खास फीचर आणू शकते. नवीन अपडेटमध्ये ग्रुपच्या अॅडमिनला ग्रुपमध्ये असलेला कोणताही मेसेज डिलीट करण्याचा अधिकार दिला जाणार आहे. या नवीन अपडेटमुळे व्हॉट्सअॅप ग्रुपवर येणाऱ्या आक्षेपार्य मेसेजेसवर आता आळा बसण्यास मदत होणार आहे.
व्हॉट्सअॅप आणखी एका फीचरवर काम करत आहे. हे फीचर ग्रुप अॅडमिनसाठी असणार आहे. मिळालेल्या रिपोर्ट्सनुसार, नवीन अपडेटमध्ये ग्रुपच्या अॅडमिनला ग्रुपमध्ये उपस्थित असलेला कोणताही मेसेज डिलीट करण्याचा अधिकार दिला जाईल. या नवीन अपडेटची व्हट्सअॅपकडून चाचपणी सुरू करण्यात आली आहे. चाचणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, हे नवीन अपडेट सर्व वापरकर्त्यांसाठी प्रसिद्ध केले जाईल.
रिपोर्ट्सनुसार, कंपनीने या फीचरसाठी बीटा व्हर्जन 2.22.1.1 अपडेट जारी केला आहे. या अपडेटमध्ये ग्रुप अॅडमिन्सना ग्रुपमधील इतर सदस्यांनी टाकलेले मेसेज डिलीट करण्याचा पर्याय देण्यात आला आहे. ग्रुप अॅडमिनने मेसेज डिलीट केल्यानंतर ग्रुप स्क्रीनवर त्याबाबत नोटिफिकेशनही येणार की हा मेसेज अॅडमिनने डिलीट केला आहे.
व्हॉट्सअॅपचे हे फीचर सुरू केल्यामुळे ग्रुप अॅडमिन चुकीचे, अश्लील आणि दिशाभूल करणारे मेसेज त्वरित थांबवू शकतील. जर कोणी चुकीची माहिती, अश्लील मजकूर आणि इतर आक्षेपार्ह मजकूर कोणत्याही ग्रुपवर टाकला असेल आणि ग्रुप अॅडमिनला तो पुढे नको असेल, तर तो मेसेज लगेच डिलीट करू शकेल. यामुळे चुकीचा मजकूर पुढे प्रसारित होण्यास आळा बसणार.