वारंवार येणाऱ्या मॅसेजेसमुळे हैराण झालाय? वाचा व्हाट्‌सऍपने आणलेलं ‘हे’ भन्नाट फिचर

नवी दिल्ली – अनेकदा व्हाट्‌सअप वर केलेले चॅट ही कमी कालावधीसाठी उपयोगी असतात. मात्र नंतर डिलिट न केल्यास ही माहीती बराच काळ फोन मध्ये राहते. आता अशा प्रकारची माहती सात दिवसात आपोआप गायब होणारी सुविधा व्हाट्‌सऍप उपलब्ध करून देणार आहे.

सर्व ग्राहकांना या महिन्यात ही सुविधा उपलब्ध होईल. यामुळे हे मेसेज प्रदीर्घकाळ फोन मध्ये राहणार नाहीत. व्हाट्‌सऍप वापरणाऱ्या ग्राहकांनी जर संबंधित मेसेज सात दिवसात नको असेल तर दिलेल्या पर्यायाचा वापर करावा लागेल.

व्यक्ती- व्यक्तीदरम्यानच्या संवाद देवाण-घेवाणीबाबत दोन्ही व्यक्ती या पर्यायाचा वापर करू शकतात. जर व्हाट्‌सऍप ग्रुप असेल तर व्हाट्‌सऍप ऍडमिनिस्ट्रेटर यासंदर्भात निर्णय घेतील. त्याचबरोबर व्हाट्‌सऍपने गरज नसलेले मेसेज डिलीट करण्यासंदर्भात एक स्टोरेज टूल उपलब्ध केले आहे. त्यामुळे अनावश्‍यक मेसेज निवडणे आणि डिलीट करणे सोपे जाणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.