दहिवडीच्या सभेत ठाकरे शेखर गोरेंना कोणता शब्द देणार..?

मतदारसंघाचे लक्ष ; सभेची जोरदार तयारी

गोंदवले – माण खटाव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार शेखरभाऊ गोरे यांच्या प्रचारार्थ शुक्रवार दि.१८ ऑक्टोंबर रोजी सकाळी १० वाजता दहिवडी (ता.माण) येथे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची जाहीर सभा होत असून या सभेची माण खटाव शिवसेनेच्या वतीने जंगी तयारी करण्यात आली आहे.

या जाहीर सभेत दुष्काळी माण खटावच्या जनतेसाठी स्वखर्चातून कोट्यावधींची विकासकामे करणारे व मागेल त्यांना टँकरने पाणी देणारे जलदुत म्हणून ख्याती असलेले शेखरभाऊ गोरे यांना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे काय शब्द देणार? याकडे सर्व मतदारसंघाचे लक्ष लागून राहिले आहे.

माण खटाव तालुक्यात शेखरभाऊ गोरे यांनी गेल्या ७ वर्षात स्वखर्चातून केलेल्या विकास कामे केली आहेत. जनतेसाठी त्यांनी केलेले कामाची दखल घेत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी त्यांना शिवसेनेत घेऊन माण विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. यावेळी ठाकरे यांनी युतीचाही विचार न करता या मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत करण्यास मित्रपक्षाला भाग पाडले. त्यानंतर अनेकदा उध्दव ठाकरे आपल्या या शिलेदारासाठी सभा घेणार का याकडे लक्ष लागून राहिले होते. अखेर प्रचारासाठी ठाकरे शुक्रवारी दहिवडीत येत आहेत.

काही दिवसांआधी म्हसवड (ता.माण) येथे नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभा घेऊन आपल्या उमेदवाराला विक्रमी मतांनी निवडून द्या मी त्यांना नामदार करतो असे सांगितले होते. त्याच मतदारसंघात महायुतीतला प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख शुक्रवारी आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी दहिवडीत येत असल्याने या सभेकडे जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागले आहे. ठाकरे हे शिवसेनेच्या उमेदवारासाठी काय बोलणार..? त्यांना कोणता शब्द देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.उध्दव ठाकरे यांची सभा होणार्‍या दहिवडी येथील इंगळे मैदानासह परिसर भगवा झाला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.