पाटण – राष्ट्रवादी व राष्ट्रीय कॉंग्रेस मित्र पक्ष महाआघाडीचे पाटण विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार युवा नेते सत्यजीतसिंह पाटणकर व सातारा लोकसभेचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री खा. शरद पवार यांची जाहीर सभा शुक्रवार, दि. 18 रोजी दुपारी दोन वाजता मल्हारपेठ, ता. पाटण येथे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ काळे यांनी पत्रकाद्वारे दिली.
सत्यजीतसिंह पाटणकर व श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारार्थ ही जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, राज्याचे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, युवा नेते सत्यजीतसिंह पाटणकर, राष्ट्रवादी माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख सारंग पाटील आदी मान्यवर नेते पदाधिकारी उपस्थित रहाणार आहेत. या जाहीर सभेस पाटण विधानसभा मतदारसंघातील जनतेने बहुसंख्येने उपस्थित रहावे, असेही आवाहन काळे यांनी केले आहे.