India Canada Tension : भारत आणि कॅनडा मध्ये निर्माण झालेल्या वादामुळे सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे, दोन्ही देशांमधील राजकीय परिस्थिती बिघडल्याचे दिसून येत आहे. भारताने कॅनडावर आरोप लावले आहे की, कॅनडा खलिस्तानी दहशतवाद्यांना आश्रय देत असल्याचा आरोप भारताकडून लावण्यात येत आहे. विशेष म्हणजे नुकतेच कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येत भारतीय एजंटांचा हात असण्याची शक्यता व्यक्त केली होती, ती भारताने फेटाळून लावली होती.
अशात प्रश्न असा उपस्थित होतो की, भारत आणि कॅनडाच्या या तणावामुळे भारताची आर्थिक स्थिती कशी असेल, भारताला यामध्ये नफा होणार की तोटा ?
– भारत आणि कॅनडा यांच्यातील आण्विक सहकार्य दुहेरी कर, विज्ञान आणि तंत्रज्ञान, कृषी, ऊर्जा, शिक्षण या सह इतर काही विषयांना घेऊन काही करार आणि द्विपक्षीय करार करण्यात आला आहे. तसेच व्यवसाय, शिक्षा, प्रवास, टूरिज्मची देवाणघेवाण आहे.
-भारताचे अनेक विद्यार्थी कॅनडामध्ये शिक्षण घेत आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 2022 पर्यंत भारतातील 13 लाख 24 हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत होते, त्यापैकी 1 लाख 83 हजारांहून अधिक विद्यार्थी एकट्या कॅनडामध्ये शिकत आहेत.
भारत कॅनडामधील करार
कॅनडामधील करारच्या मते, वित्त वर्ष 2022-23 कनाडा आणि भारत यांच्यामध्ये द्विपक्षीय व्यापार $8,161.02 दशलक्ष होता. ज्यात ७० अरब डॉलर कॅनडाची गुंतवणूक आहे. भारत हा कॅनडाचा दहावा सर्वात मोठा व्यवसाय भागीदार आहे, तर कॅनडा भारताचा ३५व सर्वात मोठा व्यवसायिक भागीदार आहे, भारत आणि कॅनडामध्ये गेल्या वीस वर्षांपासून ट्रेड एग्रीमेंटमध्ये अडकला आहे.
भारतकच्या टूरिज्ममध्ये कॅनडाचे योगदान
भारत सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीत 2021 सालामध्ये ऐकून 80,437 कॅनडा पर्यटक भारतात आले होते,जे भारतात येणाऱ्या भारतात येणाऱ्या ऐकून पर्यटकांच्या 5.3 टक्के आहे.
दोन्ही देशांमध्ये निर्यात काय होते ?
2022-23 मध्ये भारताने कॅनडाला सुमारे 4 अब्ज डॉलर्सची निर्यात केली होती. त्याच वेळी, कॅनडाने भारताला 4.05 अब्ज डॉलर्सची निर्यातही केली. निर्यात होणाऱ्या वस्तूंपैकी भारत लोखंड आणि पोलाद, फार्मा उत्पादने, कपडे, अभियांत्रिकी वस्तू, मौल्यवान दगड पाठवतो. तर कॅनडा लाकडाचा लगदा, एस्बेस्टोस, पोटॅश, लोह भंगार, कडधान्ये, न्यूजप्रिंट, खनिजे, औद्योगिक रसायने यांसारख्या वस्तू भारतात पाठवतात.