मुंबई – बॉलीवूड (Bollywood) अभिनेता शाहरुख खानच्या (ShahRukh Khan) ‘जवान’ (Jawan) चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत या चित्रपटाने 500 कोटींहून अधिक रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटात शाहरुखसह नयनतारा, विजय सेतुपती हे कलाकार देखील आहेत. त्यामुळे या चित्रपटाला चारचाँद लागले आहेत. मात्र सध्या नयनतारा चित्रपटाचे दिग्दर्शक अॅटली कुमार यांच्यावर नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. परंतु या अफवा असल्याची माहिती देत नयनताराने याबाबत खुलासा केला आहे.
नयनतारा (Nayantara) हिने ‘जवान’ दिग्दर्शक अॅटली यांच्यावर अप्रत्यक्षपणे नाराज असल्याच्या बातम्या फेटाळून लावल्या आहेत. 21 सप्टेंबर 2023 रोजी, नयनताराने इनस्टाग्राम स्टोरीवर अॅटली कुमार यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या, तसेच काही फोटो शेअर केले होते. यावेळी तिने दिग्दर्शक अॅटलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्याचा अभिमान असल्याचे सांगितले होते. नयनताराने लिहिले, “हॅपी बर्थडे अॅटली, मला तुझा खूप अभिमान वाटतो.”
एका वृत्तानुसार, नयनतारा जवान चित्रपटातील तिच्या भूमिकेत कपात केल्यामुळे दिग्दर्शकावर खूप नाराज आहे, तर चित्रपटात दीपिका पदुकोणची भूमिका वाढवण्यात आली आहे. यामुळे नयनतारा नाराज असल्याचे म्हंटले जात होते. इतकेच काय तर आता नयनताराला ‘जवान’नंतर कोणत्याच बॉलीवूडच्या चित्रपटात काम करण्यात रस नसल्याचीही चर्चा सुरू झाली होती. मात्र या अफवा असून नयनतारा आता ऍटलीवर नाराज नसल्याचे इनस्टास्टोरीवरून स्पष्ट होत आहे. दरम्यान, ‘जवान’ चित्रपट 7 सप्टेंबरला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 75 कोटींची कमाई केली होती.