अफगाणिस्तान आता तालिबान या दहशतवादी संघटनेच्या ताब्यात आहे, पण त्याआधी अमेरिकेच्या लष्कराचा धोका होता. यामुळे तालिबान जवळपास 20 वर्षे अफगाणिस्तानात सत्तेपासून दूर राहिले, पण अमेरिकन सैन्य निघून जाताच त्यांनी पुन्हा एकदा त्यावर कब्जा केला आहे. आता अफगाणिस्तानात तालिबानचे सरकार आहे. 2001 मध्ये अमेरिकेने अफगाणिस्तानमधून अल-कायदा आणि तालिबानला हुसकावून लावण्यासाठी हल्ला केला. त्यानंतर या 20 वर्षांत अमेरिकन सैनिकांनी अनेक खतरनाक दहशतवाद्यांचा खात्मा केला.
पण 2002 साली अमेरिकेच्या सैन्याला एका महादानवाशी सामना करावा लागला. या राक्षसाने अनेक अमेरिकन सैनिकांना ठार केले होते. तो अफगाणिस्तानच्या निर्जन भागात एका रहस्यमय गुहेत लपून राहत होता. जिथं एकाही अमेरिकन सैनिकाची जाण्याची हिंमत झाली नाही. चला जाणून घेऊया या कथेचे सत्य काय आहे?
अल कायदा आणि तालिबान या दहशतवादी संघटनांचा खात्मा करण्यासाठी 2002 मध्ये अमेरिकन सैन्य गुप्त ऑपरेशन करण्याच्या तयारीत होते. लपून बसलेल्या दहशतवाद्यांना शोधून मारणे हा अमेरिकन लष्कराचा उद्देश होता. हे दहशतवादी अफगाणिस्तानच्या डोंगराळ भागात असलेल्या गुहांमध्ये लपून बसले होते.
० गुहेत अनेक अमेरिकन सैनिक बेपत्ता झाले
अमेरिकन लष्कराने सैनिकांचे अनेक गट बनवले आणि त्यांना वेगवेगळ्या भागात पाठवले. अमेरिकन सैनिक त्या भागात पोहोचले जो पूर्ण निर्मनुष्य भाग होता. दूरदूरवर इथे मानवी वसाहत नव्हती. या भागात असलेल्या गुहांमध्ये अल कायदा आणि तालिबानी दहशतवादी लपून बसल्याची गुप्तचर अमेरिकन सैनिकांना होती. अमेरिकेचे सैन्य येथे असलेल्या एका गुहेत पोहोचले, जिथे पूर्णपणे अंधार होता. या गुहेतच अमेरिकन कमांडो बेपत्ता झाले होते. अमेरिकन सैनिकांनी बेपत्ता कमांडोचा खूप शोध घेतला, पण ते कुठे गेले ते कळले नाही.
या ऑपरेशनमध्ये सहभागी असलेल्या अमेरिकन कमांडोंनी गुहेत मानवी सांगाडे पाहिले आणि लष्कराचे दळणवळण संचही जप्त केले. त्यानंतर अमेरिकन सैन्याने पुढे जाऊन पाहिजे असता गुहेच्या आत त्यांना काहीतरी दिसले, त्यानंतर त्यांची भीतीने गाळण उडाली. त्यांना एक 15 फूट उंच माणूस दिसला जो राक्षसासारखा दिसत होता. यानंतर अमेरिकन सैनिकांनी गोळीबार करून त्याला ठार केले. यानंतर अमेरिकन सैनिकांनी बॉम्बस्फोट करून ती गुहा बंद केली आणि हे रहस्य कायमचे पुरले. या घटनेबाबत सोशल मीडियावर अनेक कथा लिहिल्या जात आहेत.
2002 साली घडलेल्या या घटनेबाबत अमेरिकेने कधीही कोणतेही वक्तव्य केलेले नाही. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या घटनेचा कोणताही पुरावा नाही. अमेरिकन सैनिकांनीही याबाबत काहीही सांगितले नाही. अखेर महादानवचे सत्य काय, हे अजूनही गूढच आहे.