Debit-Credit card : सध्या डिजीलायझेशनच्या युगात क्रेडिट आणि डेबिट वापरणे महत्त्वाचे झाले आहे. तसेच फसवणूकीचे देखील अनेक प्रकरण समोर येत असल्याने बँकांकडून क्रेडिट आणि डेबिट कार्डशी संबंधित तपशील कोणाशीही शेअर न करण्याचे आवाहन केले जाते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे CVV आणि OTP क्रमांक शेअर करु नका, असे सांगितले जाते.
ऑनलाइन व्यवहारादरम्यान CVV आणि CVC कोड वापरले जातात. हे कोड नसतील तर व्यवहार नाकारला जातो. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून CVV क्रमांक खूप महत्त्वाचा आहे. एका छोट्याशा चुकीमुळे तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते. त्यामुळे RBI त्यांच्या ग्राहकांना डेबिट किंवा क्रेडिट कार्ड मिळताच त्यांचा CVV क्रमांक लक्षात ठेवण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे फसवणूक होण्याची शक्यता कमी होते.
CVV किंवा CVC कोड म्हणजे काय?
CVV चा फुल फॉर्म (Card Verification Value)आणि CVC चा फुल फॉर्म (Card Verification Code)आहे. हा एक प्रकारचा कोड आहे, जो क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डच्या मागील बाजूस असतो. ऑनलाइन व्यवहार करताना तुम्हाला अनेकदा हा क्रमांक विचारला जातो. हा कोड साधारणपणे तीन अंकांचा असतो. प्रत्येक कार्ड नेटवर्क हे वेगळ्या प्रकारे ऑफरकरते. यामध्ये मास्टरकार्ड CVV कोड CVC2 आणि VISA CVV2 म्हणून असते. यासाठी वेगवेगळी तंत्रे वापरली जातात. ऑनलाइन पेमेंट करताना हा नंबर कोड म्हणून टाकाला जातो.
CVV किंवा CVC कोडमधील फरक काय ?
CVC आणि CVV मधील फरक केवळ नेटवर्कचा असून याचे काम सारखेच आहे. हा कोड कार्ड स्वाइप केल्याचे नेटवर्कला सूचित करण्यासाठी चुंबकीय पट्टीमध्ये एम्बेड केलेला असतो. हा कोड फक्त सुरक्षिततेसाठी वापरला जातो. ऑनलाइन व्यवहारादरम्यान हा कोड वापरल्यानंतर पेमेंटची पुष्टी केली जाते. वाढत्या फसवणूकीमुळे सुरक्षिततेसाठी OTP पिन तयार करण्यात आला. त्यामुळे ऑनलाइन खरेदीसाठी OTP असणे आवश्यक आहे. CVV हा OTPप्रमाणेच सुरक्षित असल्याने तो कोणालाही शेअर करू नये.