पेटीएमद्वारे आता भरा घरभाडेही…

घराचे/दुकानाचे भाडे ऑनलाईन भरण्याची प्रथमच सुविधा

नवी दिल्ली – भारतातील प्रमुख डिजिटल फायनान्शियल सर्व्हिसेस प्लॅटफॉर्म पेटीएमने आज आपल्या रेंट पेमेंट्‌स फीचरच्या विस्ताराची घोषणा केली. आता भाडेकरू घराचे मासिक भाडे क्रेडिट कार्डच्या माध्यमातून घर मालकांच्या बॅंक खात्यात त्वरित ट्रान्सफर करू शकतात. कंपनीने याच पद्धतीच्या व्यवहारावर रुपयांच्या कॅशबॅकची घोषणा केली आहे. प्रत्येक व्यवहारावर कॅशबॅक कमावण्याशिवाय युजर्स याद्वारे क्रेडिट पॉइंट्‌सही जमा करू शकतील.

घर मालकाला घराचे भाडे देण्यासाठी यूजर्सना पेटीएमच्या होम स्क्रीनवर “रिचार्ज अँड पे बिल्स’ सेक्‍शनमध्ये जाऊन “रेंट पेमेंट’ निवडावे लागेल. युजर्स आपल्या क्रेडिट कार्डातून थेट आपल्या घर मालकाच्या बॅंक खात्यात पैसे जमा करू शकतात. पेटीएम पेमेंटचे अन्य पर्याय, उदा. यूपीआय, डेबिट कार्ड आणि नेटबॅकिंगद्वारे घराचे भाडे भरण्याची यूजर्सना लवचिक सुविधा उपलब्ध करते.

या फीचरचा वापर करण्यात अडचण येऊ नये, यासाठी यूजर्सना केवळ आपल्या घर मालकाच्या बॅंक खात्याचे विवरण टाकावे लागेल. याशिवाय अन्य कोणती माहिती भरावी लागणार नाही. डॅश बोर्ड सर्व प्रकारच्या पेमेंट ट्रॅक करण्यात मदत करते. पेमेंटची तारीख लक्षात आणून देत आणि पेमेंट होण्याचे पुष्टीकरण त्वरित घर मालकांकडे पाठवली जाते.

पेटीएमचे उपाध्यक्ष नरेंद्र यादव म्हणाले, देशात भाडेकरूंसाठी एका निश्‍चित अवधीनंतर वारंवार केल्या जाणारा मोठ्या खर्चांपैकी एक आहे. लॉंचिंगच्या काही महिन्यांच्या आत आमचे रेंट पेमेंट फीचर आधीच या निश्‍चित काळात कॅश फ्लोला कायम ठेवणे व यूजर्सना सक्षम करते. हे यूजर्सना क्रेडिट सायकलनुसार भाडे देण्याची सुविधा देते. त्यासाठी यूजर्सना पेटीएमच्या होम स्क्रीनवर “रिचार्ज अँड पे बिल्स’ सेक्‍शनमध्ये जाऊन “रेंट पेमेंट’ निवडावे लागेल

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.