पळसदेव (वार्ताहर)- मंत्री छगन भुजबळ राज्यभर ओबीसी नेते म्हणून मिरवत असतात; मात्र त्यांनी ओबीसींसाठी नेमकं काय केलं, हे त्यांनी एकदा सांगावं. ओबीसी समाजाचं श्रद्धास्थन असलेल्या संत सावता माळी यांच्या अरणगावी आमदार रोहित पवार यांनी विविध विकासकामासाठो सुमारे 4 कोटी रुपयांचा निधी दिला असल्याची माहिती महारुद्र पाटील यांनी दिली.
पळसदेव येथे महाविकास आघाडीच्या प्रचार सभेत महारुद्र पाटील बोलत होते. या वेळी पाटील पुढे म्हणाले की, सध्या उजनी धरणाचे पाणी मायनसमध्ये आहे. धरणग्रस्त व शेतकर्यांचे मोठे हाल होत आहेत; मात्र आमचा आमदार फक्त कमिशन गोळा करण्यात गुंग असतो. त्यांनी उजनीच्या पाण्याचं नियोजन केलं नाही. खडकवासलाचे पाणी देण्यात राजकारण करतात. मतदाराला मतदान नाही केलं तर पाणी मिळणार नाही अशी धमकी आमदार भरणे यांनी जनतेला देत आहेत.
या वेळी लोणी देवकरचे सरपंच कालिदास देवकर म्हणाले, भरणे यांनी फक्त निकृष्ट दर्जाचे रस्ते करायचं काम केलं. मागील पाच वर्षात एक जिल्हा परिषदेचं काम केलं नसल्याची वेळी देवकर यांनी व्यक्त केली. या वेळी अमोल देवकाते, अशोक घोगरे, विकास लवांडे, सोनबा चौधरी, तानाजीराव भोंग्, कैलास भोसले, अमोल भिसे, रविकांत वरपे, मनोहर ढुके, विजय शिंदे, छगन बनसुडे, निलेश रंधवे, सुहास माने सह भावडी, लोणी देवकर, पळसदेव, माळेवाडी, न्हावी, रुई, शिंदेवस्ती भागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.