‘सलाड’ काय आहे ही भानगड

सलाड हा आजकालच्या जेवणाच्या मेनूतील एक अत्यावश्‍यक आणि सर्वांच्या आवडीचा पदार्थ आहे. सलाड हे नाव जरी नवीन वाटत असलं तरी तो पदार्थ मात्र प्रत्यक्षात तसा नवा नाही. खरं पाहिलं तर नावामुळे हा नवीन वाटणारा पदार्थ अतिशय जुना आहे. तो आपल्या सर्वांच्या ओळखीचा आणि आवडीचाही आहे. त्याचे आपले जुने सांगितले, तर तुमच्या ते ताबडतोब लक्षात येईल. अहो, आपली कोशिंबीर माहीत आहे ना तुम्हाला? ते आपली नेहमीची कोशिंबिर म्हणजेच ते सलाड! हो, अगदी बरोबर ओळखलं.

आपल्या नेवेद्याच्या ताटात असतेच ना नेहमी काकडीची कोशिंबीर प्रत्येक सणाला! ती काकडीची कोशिंबिर म्हणजेच काकडीच्या सलाडचा एक प्रकार. म्हणजे हे सलाड आपण पूर्वीपासून खात आलो आहोत. मग आताच का त्याची इतकी चर्चा करतोय? तर आपण आधी हे सलाड आता इतका का महत्वाचा आहे याचा आढावा घेऊ. नुसते खाल्ले पाहिजे असं सांगून उपयोग नाही. ते का गरजेचं आहे, ते सांगितलं आपोआप आवडेल खायला सर्वाना.

तर पूर्वी होती ती दिनचर्या आता आपली कोणाचीच राहिली नाही. ना स्त्रियांची, ना पुरुषांची. हल्ली आपले शारीरिक ताणताणाव प्रचंड वाढले आहेत. उदाहरणार्थ आपला आपल्या ऑफिसपर्यंतचा प्रवास. त्यात होणारी धावपळ आणि मानसिक ओढाताण यापासून ते आपल्या ऑफिस मधील आपल्या समोरची टार्गेट्‌स आणि त्यांनी येणारा मानसिक तणाव इथपर्यंत. हे सगळं आता स्त्री-पुरुष सर्वाना करावं लागतंय. पूर्वी शरीर धाटणी हीच होती. आताही तीच आहे. पण भोवतालची परिस्थिती, दिनचर्या, आणि खाणेपिणे हे मात्र बदलत गेलंय. आता हा बदल त्याच शरीर धाटणीला पेलवत नाहीत, झेपत नाही आणि त्रास सुरू होतात, आणि ते काही रोगांच्या स्वरूपात दिसू लागले आहेत. याची काही उदाहरणे म्हणजे मूळव्याध, बद्धकोष्ठता हे बहुतकरून अनेकांना होणारे त्रास.

म्हणून आता आपण हे शारीरिक त्रास होऊ नयेत म्हणून आपल्याला आपल्या जेवणाच्या ताटात काही पदार्थांचे प्रमाण बदलायला हरकत नाही. म्हणून एखादा चमचा कोशिंबिरी ऐवजी आता वाटीभर सलाड खायला हवे. याचा फायदा असा होतो की, आपण तंतुमय पदार्थ खाऊ लागतो. ज्यांचा आपल्या पोटाला चांगला उपयोग होतो.

हल्ली सलाड देखील इटलियन, मेक्‍सिकॅन अशी असतात. आपल्या नव्या पिढीला आवडतात. त्यात भाज्या जास्त आहेत आणि चीज वगैरेचे प्रमाण काही आहे हे असे पाहून हे प्रकार देखील खाऊन पाहायला हरकत नाही. पिझ्झा आणि मैदा प्रकार कायम खाणाऱ्या आपल्या युवा पिढीला ही सलाड खायला हरकत नाही. कारण सतत पिझ्झा ब्रेड खाणाऱ्या या मंडळीना पोटासंदर्भात लवकर तक्रारी सुरू होऊ शकतील. मधुमेह, बीपी, मूळव्याध, थायरॉईड हे रोग खूप कमी वयात आले आहेतच. तर मग आपण जेवणात हे सलाड घेत जाऊ. विविध प्रकार याचे करता येतील. गाजर, काकडी कांदा टोमाटो सलाड ची पाने, कोबी, आणि बऱ्याच भाज्या कच्चे मूग आणि लिंबू वापरून हा पदार्थ आपल्या आवडीनुसार बनवून पहा नी कसं वाटतय नक्की कळवा.

– श्रुती आफळे-देशपांडे 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.