पणजी – भाजपने गोव्यातील 40 पैकी 34 जागांवरील उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. मात्र, दिवंगत नेते मनोहर पर्रिकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रिकर यांना उमेदवारी देण्यात आलेली नाही. उत्पल यांनी ज्या पणजी विधानसभेचा आग्रह धरला होता, त्या मतदारसंघातून बाबूश मोन्सेरात यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
“Utpal ji (Utapal Parrikar- son of late former CM Manohar Parrikar) is welcome to join and fight elections on AAP ticket,” tweets AAP national convenor Arvind Kejriwal pic.twitter.com/gmPy4QzdsJ
— ANI (@ANI) January 20, 2022
यातच केजरीवाल यांनी एका खासगी चॅनलच्या वीडिओला ट्वीट करत उत्पल पर्रिकर यांना ऑफर दिली आहे. केजरीवाल यांनी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की,’भाजपचे पर्रिकर परिवाराबाबत ‘यूज एंड थ्रो’ धोरण आहे. मी नेहमी मनोहर पर्रिकर यांचा सन्मान केला. त्यामुळे AAP च्या तिकिटावर निवडणूक लढवण्यासाठी उत्पल यांचे स्वागत आहे.’ त्यांचा या ऑफरवर आता उत्पल पर्रिकर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनीभाजपच्या 40 पैकी 34 उमदेवारांची यादी जाहीर करण्यात आली. मात्र, पणजीतून उत्पल पर्रिकरांऐवजी बाबूश मोन्सेरात यांना उमेदवारी देण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. यावेळी फडणवीस यांना उत्पल पर्रिकरांच्या उमेदवारीबाबत विचारण्यात आले. त्यावर, पणजीतून विद्यमान आमदारालाच तिकीट देण्यात आले आहे. उत्पल हे आमच्या परिवारातील आहेत. त्यांना दोन जागांची ऑफर दिली होती. त्यातील एक जागा त्यांनी नाकारली. दुसऱ्या जागेबाबत त्यांच्याशी चर्चा सुरू आहे, असे सांगतानाच पर्रिकरांच्या कुटुंबाला भाजपने नेहमीच सन्मान दिला आहे, असे फडणवीस म्हणाले.