मुंबई – सुपरस्टार ‘अल्लू अर्जुन’चा बहुप्रतिक्षीत “पुष्पा द राइज’ हा चित्रपट 17 डिसेंबरला रुपेरी पडल्यावर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पुष्पाने बक्कळ कमाई केली आहे.
हा चित्रपट तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित झाला असून, अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदन्नाची केमेस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावली आहे. चित्रपटाला मिळणार प्रेक्षकांचा जोरदर प्रतिसाद पाहून लवकरच ‘अला वैकुंठपुरमलो’ हा चित्रपट देखील पुन्हा हिंदीमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे.
अल्लू अर्जुनच्या या चित्रपटानंतर आता आणखी एक दाक्षिणात्य चित्रपट हिंदीत रिमेक होणार असल्याच्या चर्चा सध्या रंगू लागल्या आहेत. सुपरस्टार महेश बाबूचा बहुचर्चित ‘सरकारु वारी पाटा’हा चित्रपट हिंदीत येणार आहे.
View this post on Instagram
त्यासाठी चित्रपटाचे निर्माते जोरदार तयारीला लागले असून, लवकरच हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. महेश बाबू हा अतिशय लोकप्रिय अभिनेता आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये त्याच्या चित्रपटाबाबत नेहमीच उत्सुकता पाहायला मिळते.