मुंबई- उन्हाळ्याच्या तोंडावरच राज्यात पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस राज्यातील काही ठिकाणी हवामान ढगाळ राहणार आहे. तसेच पावसाच्या सरीही कोसळण्याची शक्यता आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्, विदर्भात गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
देशभारत काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता असून काही ठिकाणी वादळी वारेही वाहू लागल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 7 ते 9 मार्च दरम्यान महाराष्ट्र, गुजरात, पू.राजस्थान व प. मध्य प्रदेशात विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकणात ढगाळ वातावरण राहणार असून हलक्या पावसाची शक्यता आहे.
Latest satellite obs at 2.30 pm indicating the position of deep depression over SW BoB.
Interior of Maharashtra also isolated mod clouds are observed
5 days all India severe weather warning issued by IMD today. pic.twitter.com/HgnhWG13d5— K S Hosalikar (@Hosalikar_KS) March 5, 2022
दरम्यान, तापमानात वाढीमुळे राज्यात उन्हाच्या झळा जाणवत आहेत. उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झालेत. आता पावसाच्या सरी बरसल्यानंतर नागरिकांना उन्हापासून काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. पण अचानक आलेल्या या आस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. सध्या रब्बीचा हंगाम काढणीला आलेला आहे. याआधीही रब्बी हंगामाच्या सुरुवातीला ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात पाऊस पडला होता. तसेच डिसेंबर महिन्यातही राज्यात पावसाच्या सरी बरसल्या. तर काही ठिकाणी गारपीटही झाली होती.