ग्राहकांना दर्जेदार माल पुरविणार : पवार

खडकवासला – शेतकऱ्यांनी आपल्या शेतात उत्पादित केलेला दर्जेदार व चांगला माल थेट ग्राहकांपर्यंत पोहचविण्यासाठी कृषी पणन मंडळ सदैव प्रयत्नशील असते असे महाराष्ट्र राज्य ऍग्रीकल्चरल मार्केटींग बोर्डाचे व्यवस्थापकीय संचालक सुनील पवार यांनी आंबा महोत्सव उद्‌घाटनप्रसंगी वडगाव येथे व्यक्त केले. सिंहगड रोड परिसरातील वडगाव बुद्रुक येथे अभिरुची शेजारी आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या महोत्सवाचे आयोजन संकल्प प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष निलेश गिरमे यांनी केले आहे. रत्नागिरीचे शेतकरी आपल्या शेतातील दर्जेदार,उत्तम प्रतीचा व नैसर्गिकरित्या पिकविलेल्या आंबा थेट ग्राहकांपर्यंत अत्यंत माफक दरात पोहोचविणार असल्याचे सुनिल पवार यांनी सांगितले. या वेळी निलेश गिरमे, राहुल हरिभक्त, समीर बडदे, प्रशांत जाधव, लोकेश राठोड, राम तोरकडी, सुरज लोखंडे, प्रशांत जाधव, भरत होलगे धनंजय डोबे, संजय गायकवाड, नाना मोहोळ, निलेश पोळ, विजय कणसे हे उपस्थित होते. उन्हामुळे आंबा महोत्सव सायंकाळी 5 ते 10 वाजेपर्यंत राहणार आहे. याशिवाय संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने पारंपारिक पाण्याच्या पिशव्यांचे वाटप पीएमपीएल बस चालक, वाहक तसेच ऑटो रिक्षा चालकांना करण्यात आले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×