नवी दिल्ली :- आशियाई स्पर्धेच्या पात्रतेसाठी चाचणी स्पर्धेत सवलत मिळावी अशी मागणी आम्ही कधीही केलेली नव्हती. आमच्यावर खोटे आरोप केले जात आहेत व आंदोलनकर्त्या कुस्तूपटूंमध्ये फुट पाडण्याची ही एक खेळी केळली जात आहे, अशा शब्दात देशाची अव्वल महिला कुस्तीपटू साक्षी मलिक व ऑलिम्पिकपटू कुस्तीपटू बजरंग पुनिया यांनी खुलासा केला आहे.
भारतीय ऑलिम्पिक संघटनेने भारतीय कुस्तीगिर महासंघावर नियुक्ती केलेल्या हंगामी समितीने विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांच्याप्रमाणे साक्षीलाही चाचणीतून सवलत दिली होती.
साक्षी मलिक, विनेश फोगट आणि बजरंगने भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरूद्ध लैंगिक शोषणाचा आरोप करत जंतर मंतरवर आंदोलन केलं होते. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून दिल्लीच्या न्यायायलायने ब्रिजभूषण यांना या प्रकरणात जामीनही दिला आहे.
साक्षी मलिक सध्या अमेरिकेत सराव करत आहे. आशियाई स्पर्धेच्या तयारीसाठी सरावाला वेळ मिळावा यासाठी आम्ही केवळ जास्तीचा वेळ मागिताला होता. चाचणीतूंन कोणतीही सवलत मागितली नव्हती. तसेच ही चाचणी ऑगस्ट महिन्यात घेण्याची मागणी केली होती. सरकारने आम्हाला वेळ दिला म्हणूनच आम्ही येथे सराव करण्यासाठी आलो आहोत, असे साक्षीने म्हटले आहे.
चाचणीशिवाय सहभागी होणार नाही…
गेल्या काही दिवसांपूर्वी आम्हाला माहिती मिळाली की विनेश व बजरंगला थेट प्रवेश दिला जाणार आहे. मलाही ईमेल करण्यास सांगितले होते. त्याद्वारे माझ्या नावाचा देखील विचार केला जावा, मात्र मी नकार दिला. चाचणी दिल्यावरच मी पात्र ठरले तरच त्या स्पर्धेत केळण्याचा मला नैतिक अधिकार आहे. कोणत्याच स्पर्धेत निवड चाचणी न देता मी सहभागी झालेले नाही व यापुढे देखील होणार नाही. आम्ही केवळ सरावासाठी जास्तीचा वेळ मागितला होता, असेही साक्षीने सांगितले.