नवी दिल्ली – भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणूकीत अध्यक्षपदी निवडून आलेल्या नव्या कार्रकारणीला केंद्रिय क्रीडा मंत्रालयाने निलंबित केले आहे. मात्र, अध्यक्षपदी विराजमान झालेल्या संजय सिंह यांना या पदावरून दूर करा अन्य सदस्यांबाबत आमचा आक्षेप नाही, असे मत भारताची ऑलिम्पिकपटू महिला कुस्तीगीर साक्षी मलिक हीने व्यक्त केले आहे.
महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांना बाजूला करत महासंघावर भारतीय ऑलिम्पिक संघटनेने हंगामी समिती नेमली होती व या समितीच्याच देखरेखीखाली नव्याने निवडणूक झाली. त्यात संजय सिंह अध्यक्षपदी निवडून आले होते. त्यानंतर साक्षीने निषेध व्यक्त करत आपली निवृत्ती जाहीर केली होती व संजय सिंह यांच्या निवडीवर आक्षेप घेतला होता.
WFI Suspension | आम्ही क्रीडा मंत्रालयाला मानत नाही – संजय सिंह
दरम्यान, भारतीय कुस्तीगिर महासंघाच्या निवडणूकीत अध्यक्षपदी निवडून आलेल्या संजय सिंह यंनी आता थेट भारतीय क्रीडा मंत्रालयाविरुद्धच दंड थोपटले आहेत. मंत्रालयाने नव्या कार्यकारणीला निलंबित केल्यावरही आम्ही मंत्रालयाला मानत नाही अशी थेट भूमीका सिंह यांनी घेतली आहे.
आम्ही निवडून आलो आहोत व संपूर्ण प्रक्रीया पारदर्शीपणे झाली आहे. त्यात मंत्रालयाने केलेल्या कारवाईमुळे विनाकारण हस्तक्षेप होत आहे. आमची नवी कार्यकारणी येत्या काळात कुस्ती स्पर्धा घेणारच, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.