Entertainment : सा रे ग म प लिटिल चॅम्प्समधून गायिका मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे घराघरात पोहचले. या कार्यक्रमामुळे त्यांना एक वेगळी ओळख मिळाली. या शोपासून सुरुवात झालेल्या या दोघांचा प्रवास आता कायमचा एकत्र बांधला गेला आहे. नुकतेच मुग्धा आणि प्रथमेश यांचा विवाहसोहळा थाटामाटात पार पडला. सध्या त्यांच्या लग्नाचे फोटो देखील सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. मुग्धा वैशंपायनने देखील लग्नाचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे यांच्या विवाहसोहळा कुटुंबिय, जवळचे नातेवाईक तसंच मित्रपरिवाराच्या उपस्थितीत पार पडला. या आवडत्या जोडीवर चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केलाय. चिपळून येथे हा विवाहसोहळा पार पडला. साध्या आणि पारंपरिक पद्धतीने पार पडलेल्या त्यांच्या लग्नाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. दरम्यान आता मुग्धाने त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोला तिने ‘आमचं झालंय’ असे कॅप्शन दिले आहे.
View this post on Instagram
यावेळी मुग्धाने पिवळ्या रंगाची साडी आणि त्यावर हिरव्या रंगाचा ब्लाउज घातला आहे. नाकात नथ, मुंडावळ्या, केसांचा आंबाडा, खोप आणि हातात हिरव्या बांगड्या असा साजश्रृंगार तिने केला होता. तर मॉनिटर म्हणजेच प्रथमेशने लाल रंगाचा कुर्ता आणि त्यावर पिवळ्या रंगाची शाल, धोतर नेसले होते. सोबतच लाल रंगाचा पेशवाई फेटा घातला होता. दोघांचाही हा चाहत्यांच्या प्रचंड पसंतीस पडला आहे.
दरम्यान, नोव्हेंबर महिन्यात 5 तारखेला प्रथमेश आणि मुग्धाचा साखरपुडा पार पडला होता. तर काही दिवसांपूर्वीच मुग्धाच्या बहिणीचंही लग्न झालं. त्यानंतर अखेर 21 डिसेंबर रोजी मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटेची जोडी विवाहबंधनात अडकली. सध्या त्यांच्या चाहत्यांकडून आणि कलाकरांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.