पुणे -महापालिकेकडून समान पाणी योजना तसेच पाण्याचे ऑडीट करण्यासाठी पालिकेच्या वेगवेगळ्या भागातील जलवाहिन्यांवर फ्लो मीटर बसविणेचे काम हाती घेण्यात आले आहे. परिणामी, येत्या 13 फेब्रुवारी (सोमवारी) कात्रज परिसरातील काही भाग तर 14 फेब्रुवारी (मंगळवारी) सिंहगड रस्ता परिसरातील काही भागाचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. यामुळे बाधित भागांस सदर दिवशी पाणीपुरवठा बंद होणार आहे. तर दुसऱ्या दिवशी सकाळी आणि उशीराने पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येणार आहे.
सोमवारी पाणी पुरवठा बंद असलेला भाग : आगम मंदिर टाकी – रोजी दत्तनगर, आगम मंदिर, संतोषीनगर, अंजलीनगर, जांभूळवाडी रस्ता, आंबेगाव रस्ता आणि परिसर मंगळवारी पाणी बंद असलेला भाग : वडगाव टाकी : रोजी वडगाव बु., निवृत्ती नगर, चरवड वस्ती, जाधवनगर, गोसावी वस्ती, सिंहगड कॉलेज परिसर. असे नियोजन करण्यात आले आहे.