मुंबई : राज्यात कोरोनाने आता डोके वर काढण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. जयंत पाटील यांनी ट्वीट करुन आपली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याची माहिती दिली आहे.
जयंत पाटील यांनी नुकतेच राज्यभर परिवार संवाद यात्रा केली होती. याला जोरदार प्रतिसाद देखील मिळाला होता. तसेच परवा राष्ट्रवादी कार्यालयात त्यांचा वाढदिवस देखील साजरा करण्यात आला.
माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे मात्र तब्येत उत्तम आहे, काळजी करण्यासारखे काही नाही. डॉक्टरांचा योग्य सल्ला घेत आहे, लवकरच प्रत्यक्षात आपल्या सेवेत रुजू होईल. आपण माझ्या संपर्कात आले असल्यास, आपली कोरोना चाचणी करून घ्यावी अशी विनंती करतो.
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) February 18, 2021
जयंत पाटील यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे मात्र तब्येत उत्तम आहे, काळजी करण्यासारखे काही नाही. डॉक्टरांचा योग्य सल्ला घेत आहे, लवकरच प्रत्यक्षात आपल्या सेवेत रुजू होईल. आपण माझ्या संपर्कात आले असल्यास, आपली कोरोना चाचणी करून घ्यावी अशी विनंती करतो. जितकं कामकाज व्हर्च्युअली करणे शक्य होईल सध्या तितके करण्याचा प्रयत्न करतो आहे, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.