नायजेरियात कट्टरवाद्यांकडून 40 विद्यार्थ्यांचे अपहरण

जागतिक पातळीवर संताप व्यक्‍त

कानो, (नायजेरिया) – नायजेरियातील मध्य प्रांतात काही बंदुकधाऱ्यांनी एका शाळेवर हल्ला करून 40 विद्यार्थ्यांचे अपहरण केले आहे. यावेळी एका विद्यार्थ्याची हत्याही करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांसह शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या पालकांनाही बंदुकधाऱ्यांनी आपल्याबरोबर पळवून नेले. अध्यक्ष मुहम्मू बुहारी यांनी या विद्यार्थ्यांची सुटका करण्यासाठी सुरक्षा दलाला आदेश दिले आहेत, असे त्यांच्या कार्यालयाने सांगितले.

लष्करी गणवेश घातलेल्या बंदूकधाऱ्यांनी नायजेरमधील कागारा गावात शासकीय विज्ञान महाविद्यालयावर हल्ला केला आणि 42 जणांना ताब्यात घेतले. या सर्वांना घेऊन बंदुकधारी जवळच्या जंगलामध्ये पळून गेले. हल्ला झालेली शाळा निवासी शाळा असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मंगळवारी रात्री उशिरा हल्ला झाला तेव्हा त्या शाळेत 650 विद्यार्थी होते.

वायव्य आणि मध्य नायजेरियात स्थानिक बॅंडिट्‌स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या सशस्त्र टोळ्या खंडणीसाठी अपहरण, बलात्कार आणि लुटमार करत असतात. अलिकडच्या वर्षांत या टोळ्यांच्या हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. दोनच महिन्यांपूर्वी जवळच्या काटसीना राज्यातील कंकारा येथील एका शाळेत 300 हून अधिक विद्यार्थ्यांचे अपहरण करण्यात आले होते.

नंतर सरकारी अधिकाऱ्यांनी केलेल्या वाटाघाटीनंतर या मुलांना मुक्त करण्यात आले पण या घटनेने जागतिक पातळीवर संताप व्यक्‍त झाला होता.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.