मुंबई – बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांच्या ‘गोडसे-गांधी एक युद्ध’ या चित्रपटाची झलक प्रेक्षकांसमोर आली आहे. मोशन पोस्टर प्रसिद्ध झाल्यापासून चर्चेत असलेल्या या सिनेमाचा टीजर निर्मात्यांनी प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. चित्रपटात नथुराम गोडसेची भूमिका मराठमोळा अभिनेता चिन्मय मांडलेकर याने साकारली आहे. टीजरवरून तरी दोन विचारांमधील संघर्ष या चित्रपटात दाखवला जाणार असलयाचे दिसून येते.
टीजरच्या सुरुवातीला महात्मा गांधींची हत्या होताना दाखवण्यात आलं आहे. गोडसे आणि गांधीजी यांच्यातील विचारांची लढाई यानिमित्ताने पाहायला मिळणार आहे. टीजरच्या शेवटी गोडसे गांधींना म्हणतो,तुमच्याकडे एक खतरनाक हत्यार आहे. आमरण उपोषण ज्याचा वापर करून तुम्ही हवी ती गोष्ट मनवून घेता. ही एक प्रकराची हिंसाच आहे,ही मानसिक हिंसा आहे”.
टीजरने चित्रपटाबाबतची उत्सुकता कमालीची वाढवली आहे. दमदार लूक आणि जबरदस्त डायलॉग यामुळे टीजर प्रेक्षकांना चांगलाच आवडला असल्याचे अनेकांनी सोशल मीडियावर म्हंटले आहे. राजकुमार संतोषी हे चित्रपटाचे दिग्दर्शकी असून ए आर रेहमानने या चित्रपटाला संगीत दिल आहे. येत्या २६ जानेवारीला म्हणजेच प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.