हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफच्या ‘वॉर’ च्या पहिल्या दिवसाचे कलेक्शनचे आकडे समोर आले आहेत. हृतिक आणि टायगर या दोघाही ऍक्शन हिरोंना एकत्र बघण्यासाठी प्रेक्षक आतुर होते. “वॉर’ला प्रेक्षकांनी पहिल्यापासून खूप चांगली पसंती दिली आहे. बॉक्स ऑफिसच्या आकडेवारीनुसार “वॉर’चे ओपनिंग खूपच जबरदस्त झाले आहे आणि पहिल्या दिवशीच या ऍक्शनपॅक्ड सिनेमाने 50 कोटींपेक्षा जास्त गल्ला जमवला आहे. ‘वॉर’च्या पहिल्या दिवशी 51 कोटींचे कलेक्शन जमा झाले आहे.
“वॉर’ च्य बरोबर रिलीज झालेल्या सर्व चित्रपटाचा “वॉर’ने धोबीपछाड दिली आहे. “वॉर’च्या बरोबर अमिताभ आणि चिरंजीवीचा “सई रा नरसिंहा रेड्डी’देखील रिलीज झाला आहे. बॉक्स ऑफिसच्या रिपोर्टनुसार “सई रा नरसिंहा रेड्डी’ने केवळ् 2.50 कोटी रुपयांचे ओपनिंग मिळवले आहे.
याशिवाय “जोकर’देखील रिलीज झाला असून त्याचे ओपनिंग “सई रा नरसिंहा…’पेक्षा थोडे अधिक चांगले आहे. “जोकर’ला पहिल्या दिवशी 5.75 कोटींचे ओपनिंग मिळाले आहे. जोकरला बऱ्यापैकी पॉजिटिव्ह रिस्पॉन्स मिळतो आहे. मात्र “वॉर’ दोघांच्याही पुढे आहे. “वॉर’ची 51 कोटींची ओपनिंग केवळ हिंदी व्हर्जनची आहे. सर्व व्हर्जन मिळून ओपनिंग 53.35 कोटींच्या पुढे आहे.