नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना डेन्मार्कच्या कोपेनहेगनमध्ये होणाया सी40 शिखर संमेलनात सहभागी होण्यासाठी जायचे आहे. मात्र, परराष्ट्र मंत्रालयाची अद्यापही परवानगी न मिळाल्यामुळे केजरीवाल यांचा दौरा अधांतरी लटकला आहे.
डेन्मार्कच्या कोपेनहेगनमध्ये 9 ते 12 ऑक्टोबर दरम्यान सी40 शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. दिल्ली जगातील सर्वात मोठ्या महानगरापैकी एक असल्यामुळे केजरीवाल यांना यात आमंत्रित करण्यात आले आहे. न्यूयॉर्क, लंडन, पॅरिस, लॉंस एंजेलिस आणि बर्लिन यासारख्या शहरातील नेत्यांसोबत व्यासपीठावर असतील.
दिल्ली शहराने प्रदुषणावर कमी मात मिळविली आणि यासाठी सरकारने कायकाय केले, याची विस्तृत माहिती अरविंद केजरीवाल या शिखर संमेलनात देणार आहेत. याशिवाय प्रदुषण कमी करण्यासाठी आणखी कायकाय करण्याची गरज आहे यावरही ते बोलतील. ‘ही ब्रिथ डिप्ली’ या कार्यक्रमात विविध देशातील नेते आणि वैज्ञानित त्यांच्या देशातील समस्या आणि त्यावरच्या समाधानाबाबतही आपली मत व्यक्त करणार आहेत. थोडक्यात, भारतातील उदयीमान नेता म्हणून जागतिक व्यासपीठावर झळकण्याची संधी केजरीवाल यांच्या समोर आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री या नात्याने केजरीवाल यांनी राबविलेली ‘ऑडइवन’ योजना यशस्वी झाली होती. अशाप्रकारची योजना पॅरिस आणि काही निवडक शहरांमध्येच यशस्वीरित्या राबविता आली होती. दिल्ली सरकारने पहिल्यांदा ही योजना 2016 मध्ये राबविली तेव्हा जगामध्ये याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली होती. केजरीवाल याबाबतही बोलणार आहेत.
मात्र, या बैठकीत सहभागी होण्यासाठी आवश्यक परराष्ट्र मंत्रालयाची परवानगी त्यांना अद्याप मिळालेली नाही. केजरीवाल सध्या परवागनीची प्रतिक्षा करीत आहेत.