पुणतांबा – लॉकडाऊन काळातील शासनाच्या नियमांचे उल्लघंन करणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, मास्क न लावता बाहेर पडणे यासाठी दंडात्मक कारवाई करणार असल्याचा इशारा सरपंच डॉ. धनंजय धनवटे यांनी दिला. पुणतांबा आपत्ती व्यवस्थापन समितीची जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मैदानात सामाजिक अंतर ठेऊन मिटींग घेण्यात आली.
यावेळी सरपंच डॉ. धनंजय धनवटे, माजी सरपंच मुरलीधर थोरात, तंटामुक्ती समिती अध्यक्ष सुहास वहाडणे, सर्जेराव जाधव, विजय धनवटे, कामगार नेते सुभाष कुलकर्णी, सुभाष वहाडणे, नितीन जोगदंड, योगेश घाटकर, संदिप धनवटे, बाळासाहेब चव्हाण, माधव ओझा, चंद्रकांत डोखे, सोमनाथ पटाईत, दिलीप कुसळकर, सहायक पोलिस उपनिरिक्षक किसन पवार, कुमार हासे उपस्थित होते.