वॉर्नरची मुलगी म्हणते “मीच कोहली’

सिडनी: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आता केवळ भारतातच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यातही आयडॉल बनला आहे. केवळ चाहतेच नव्हे तर प्रतिस्पर्धी संघातील खेळाडू त्यांचा परिवार देखील कोहलीचा चाहता बनला आहे.

ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरची 4 वर्षांची मुलगी कॅन्डी कोहलीची फलंदाजी पाहुन त्याच्यासारखे खेळायचा सराव करते आणि मीच कोहली असल्याचे सांगत आहे.

ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरने चेंडू कुडतडल्याप्रकरणी बंदी भोगल्यानंतर आता पन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दमदार पुनरागमन केले आहे. त्यानेच आपल्या 4 वर्षांच्या मुलीचा क्रिकेट खेळतानाचे व्हिडीओ तसेच छायाचित्रे सोशल मीडियावर पोस्ट केली आहेत.

वॉर्नर गोलंदाजी करत असून त्याची मुलगी फलंदाजी करत असल्याची ही पोस्ट आहे. वॉर्नरच्या मुलीला आपल्या वडिलांप्रमाणे नव्हे तर कोहलीसारखे खेळाडू व्हायचे आहे. वॉर्नरच्या मुलीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.