#Wari2019 : आळंदीत वारकऱ्यांची मांदियाळी

आळंदी: भगव्या पताका, टाळ-मृदंगाच्या निनादात आणि ज्ञानोबा माऊली तुकारामांचा गजर करीत दिंडी व पालखीसमवेत राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने वारकरी आळंदीनगरीत दाखल झाल्याने पवित्र इंद्रायणीकाठ वारकऱ्यांनी गजबजून निघाला आहे.

इंद्रायणीतीरी दिवसभर फेर, फुगड्या, नामघोष करून वारकरी प्रस्थानपूर्वीचा आनंद मनसोक्‍त लुटत आहेत. टाळ मृदंगाचा निनाद व ज्ञानोबा तुकारामांच्या जयघोषाने संपूर्ण अलंकापुरी वारकऱ्यांनी दुमदुमून सोडली आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×