#CWC19 : ऑस्ट्रेलियाचे इंग्लंडसमोर 286 धावांचे आव्हान

लंडन – अॅरोन फिंचची शतकी आणि डेव्हिड वॉर्नरच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने इंग्लंड संघासमोर विजयासाठी 286 धावांचे आव्हान ठेवले आहे. ऑस्ट्रेलियाने 50 षटकांत 7 बाद 285 धावा केल्या आहेत.

तत्पूर्वी इंग्लंडचा कर्णधार इऑन मॉर्गन याने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत ऑस्ट्रेलिया संघास प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले होते. ऑस्ट्रेलियाची सुरूवात चांगली झाली. दोन्ही सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी 123 धावांची भागिदारी केली. सलामीवीर अॅरोन फिंच याने 116 चेंडूत 100 तर डेव्हिड वॉर्नरने 61 चेंडूत 53 धावा केल्या. तर स्टीव स्मिथ आणि एलेक्स कैरी यांनी प्रत्येकी 38 धावा केल्या.

इंग्लंडकडून गोलंदाजीत क्रिस वोक्स याने 10 षटकात 46 धावा देत 2 विकेटस घेतल्या. तर जोफ्रा आर्चर, मार्क वुड, बेन स्टोक्स आणि मोईन अली यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×