न्यूयॉर्क -ग्रॅण्डस्लॅम टेनिस जगतातील महत्त्वाची स्पर्धा असलेल्या अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या (यूएस ओपन) आयोजनासाठी अमेरिका टेनिस संघटनेने कंबर कसली आहे. मात्र, करोनाचा धोका अद्याप कायम असल्याने या स्पर्धेच्या आयोजनासाठी संघटना सरकारच्या परवानगीची प्रतीक्षा करत आहे.
करोनाचा धोका वाढू लागल्याने जगभरातील स्पर्धा एकतर रद्द झाल्या किंवा लांबणीवर टाकण्यात आल्या. याच धोक्यामुळे ग्रॅण्डस्लॅममधील प्रतिष्ठेची मानली जाणारी विम्बल्डन स्पर्धाही रद्द करण्यात आली होती. आता ऑस्ट्रेलियन, फ्रेंच यांच्याबरोबरच अमेरिकन स्पर्धा होणार का नाही असा प्रश्न पडलेला होता. मात्र, सरकारने परवानगी दिली तर टेनिस कोर्ट रिकामे ठेवून ही स्पर्धा खेळविण्याची तयारी असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.