वाघोली – वाघोली तालुका हवेली येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र सातव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दिनदर्शिका तयार केलेली असून यात दिनविशेष, पंचाग, आदींचा समावेश असून याचे अनावरण शिरूर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप, शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार, सभापती सुजाता पवार, अहमदनगर चे आमदार निलेश लंके यांच्या शुभहस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळी गणेश सातव पाटील, अतुल शिंदे, सचिन काळे आदी मान्यवर उपस्थित होते.
वाघोली आणि पंचक्रोशीतील नागरिकांसाठी जवळपास 20 हजार दिनदर्शिका मोफत वाटप करण्यात आल्या असून नागरिकांनी मागणी केली तर अजून देखील दिनदर्शिका उपलब्ध करून देण्यात येईल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते राजेंद्र सातव पाटील, माजी सरपंच जयश्री राजेंद्र सातव पाटील,चिराग सातव पाटील यांनी सांगितले.