वाघोली(प्रतिनिधी): वाघोली ता. हवेली येथे कोरोना रोगाचा वाढता प्रादुर्भाव आणि लॉक डाऊन आणि काही भाग सील केल्याने नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे कामी अडचण येत असल्याने वाघोली मधील जवळपास ६०० कुटुंबीयांना वाघोलीचे माजी उपसरपंच राजेंद्र अमृतराव सातव पाटील, माजी सरपंच जयश्री राजेंद्र सातव पाटील, चिराग राजेंद्र सातव,पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या उपाध्यक्षा पूजा मयूर अडसरे यांच्या स्व खर्चातून भाजीपाल्याचे व किराणा साहित्याचे वाटप करून सातव कुटुंबीयांनी सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
वाघोली विकास प्रतिष्ठान तथा वाघेश्वर देवस्थानच्या सर्व संचालक मंडळांच्या मान्यतेने तमाम ग्रामस्थांच्या मागणीचा विचार करून देवस्थानच्या वतीने नुकत्याच झालेल्या लॉक डाऊन च्या कालावधीत अन्नदान कार्यक्रमांमध्ये देवस्थान तर्फे एक लाख रुपयांचे साहित्य देण्यात आल्याचे राजेंद्र सातव पाटील यांनी सांगितले.वाघोली मध्ये मोल मजुरी करणाऱ्या व हातावर पोट असणाऱ्या मजुरांची संख्या जास्त आहे या मजुरांना दोन वेळचे जेवण उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने योग्य ती पावले उचलण्याची मागणी सातव यांनी केली आहे.
माजी सरपंच जयश्री राजेंद्र सातव पाटील यांनी याच कालावधीत महिलांना किराण्याची व भाजीपाल्याची गरज लक्षात घेऊन कुटुंबाच्या पाठबळावर परिसरातील शेतकऱ्यांकडून शेतमाल खरेदी करून भाजीपाल्याची उत्तम पॅकिंग करून महिलांच्या घरोघरी सोशल डिस्टन्स इन ठेवून साहित्य वाटप करण्याचा अभिनव उपक्रम राबवला आहे. वाघोलीतील दानशूर मंडळी, संस्था, पदाधिकारी यांनी घरी थांबून सुरक्षित राहून आपल्या परिसरातील आजूबाजूचे नागरिकांना या लॉक डाऊन च्या कालावधीमध्ये शक्य तेवढी मदत करण्याचे आवाहान राजेंद्र सातव पाटील, जयश्री सातव पाटील यांनी केले आहे.