वाघोली ( प्रतिनिधी) : वाडेबोल्हाई तालुका हवेली येथील ग्रामपंचायतीच्या सदस्या सुरेखाताई सोपान गावडे यांनी स्वखर्चातून भोर वस्ती लगत असणाऱ्या रस्त्यांचे मुरमीकरण करून एक आदर्श उभा केला आहे.
पावसाळ्यात वाड्या-वस्त्या वर जाताना नागरिकांना खड्ड्यांमुळे त्रास होतो हा त्रास दूर करण्यासाठी युवा उद्योजक रोहित गावडे यांच्या संकल्पनेतून वाडेबोल्हाई ग्रामपंचायत सदस्य सुरेखा सोपान गावडे व सोपान प्रभू गावडे यांनी स्वखर्चातून भोर वस्ती लगतचे सर्व रस्ते मुरमीकरण करून एक आदर्श उभा केला असल्याचे श्रीक्षेत्र बोल्हाई माता देवस्थानचे विश्वस्त राजेंद्र इंगळे, दिलीप शेटिया यांनी सांगितले.
यावेळी सरपंच दीपक गावडे, प्रभाकर भोर, पंडित भोर, नंदकुमार भोर, नवनाथ भोर, मनू गावडे, संजय भोर,माजी उपसरपंच समीर भोर, नाना गावडे, प्रकाश भोर, सागर गावडे , विशाल भोर, विशाल कोलते, कल्पेश भोर, सिद्धांत भोर, आकाश भोर, सुमित भोर, संदीप गावडे, राजेंद्र भोर,राकेश भोर, आनंदा भोर, नामदेव भोर, संध्याताई संपत भोर व ग्रामस्थ यांच्या उपस्थित मुरमीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले .