चेन्नई – चेन्नई शहरात बेकायदेशीरपणे वास्तव्यास असलेल्या नऊ इराणी नागरीकांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडे बोगस आधारकार्डेही असल्याचे निष्पन्न झाले आहे.
चेन्नाईत लुटीच्या तीन घटनांमध्ये एका सोमालियन नागरीकाला पोलिस असल्याचे सांगून लुबाडल्याचा प्रकार घडला आहे त्याचा तपास करीत असताना तेथे हे नऊ इराणी नागरीक बेकायदेशीरपणे राहात असल्याचे निष्पन्न झाले आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये तीन महिलांचाही समावेश आहे.
हे सर्व जण कोवालयम भागातील समुद्र किनारी असलेल्या एका रिसॉर्ट मध्ये राहात होते. या इराणी नागरीकांकडे आधारकार्डेही सापडली आहेत. पण ती बोगस असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यांच्याकडे प्रवासाची कोणतीही वैध कागदपत्रे नाहींत. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली आहे.