वाघोली आव्हाळवाडी रस्त्याचे काम सुरु

माजी उपसरपंच संदीप सातव यांच्या पाठपुराव्याला यश

वाघोली :  वाघोली मधून आव्हाळवाडी कडे जाणाऱ्या राज्य मार्गाचे अनेक दिवसांपासून रखडलेले कामाला माजी उपसरपंच संदीप सातव यांच्या पाठपुराव्यामुळे यश आले असून सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचे काम सुरू झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. याबाबत माजी उपसरपंच संदीप सातव यांनी सांगितले की वाघोली आव्हाळवाडी रस्त्याचे काम दर्जेदार व्हावे यासाठी अनेक दिवसापासून पाठपुरावा सुरू होता.

अनेक दिवसांच्या पाठपुरावा नंतर अखेर वाघोली आव्हाळवाडी रस्त्याचे सिमेंट कॉंक्रीटीकरण याचे काम चालू झाले असून रस्त्याच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही.याबाबतच्या सूचना संबंधित ठेकेदाराला दिल्या  असून नागरिकांच्या उपस्थितीत या रस्त्याची पाहणी करण्यात आली.

पावसाचे पाणी रस्त्यावर येत असल्याने  रस्ता हा वारंवार खराब होत असे त्यामुळे नागरिकांना या रस्त्याने येण्या-जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत असे. रस्त्यांच्या मजबूत होण्यामुळे ही कसरत थांबणार असल्याने रस्ता दर्जेदार करण्यासाठी व नाल्या वरती सिमेंट पाईप टाकून मोरी करण्याबाबत संबंधित ठेकेदाराला सूचना दिल्या असल्याचे संदीप सातव यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.