दुपारपर्यंत मतांची टक्‍केवारी चाळीसच्या आतच

पुणे – जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघात मतदानाचा टक्‍का दुपारपर्यंत चाळीच्या आसपास घुटमळला. त्यानंतर टक्‍केवारीत थोडीशी वाढ झाली. राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, भाजपच्या स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांकडून मतदारांना केंद्रात आणण्यासाठी धडपड करताना दिसत होते. त्यामुळे सायंकाळपर्यंत मतदानाचा टक्‍का वाढला.

जिल्ह्यात लक्षवेधी ठरलेल्या शिरूर- हवेली, दौंड, इंदापूर, जुन्नर, पुरंदर- हवेली विधानसभा मतदारसंघात सकाळी अकरा वाजेपर्यंत मतदानाचा टक्‍का हा सरासरी वीशींवर ठेपला होता. जुन्नर तालुक्‍यात 22 टक्‍के मतदान झाले होते. आंबेगावमध्ये 20.18 टक्‍के मतदान झाले. इंदापूर तालुक्‍यात 18.05 टक्‍के मतदान झाले. दौंड तालुक्‍यात 12 टक्‍के मतदान झाले. पुरंदर तालुक्‍यात 12.05 टक्‍के मतदान झाले. ही आकडेवारी सकाळी अकरापर्यंतची निरूउत्साह दाखविणारी होती. त्यानंतर मतदारांमध्ये उत्साह वाढत गेला. दुपारी एकपयर्यंत जुन्नर तालुक्‍यात 13 टक्‍क्‍यांची वाढ झाली.

आंबेगाव तालुक्‍यात 16 टक्‍के मतदान वाढले. इंदापूर तालुक्‍यात 16 टक्‍के मतदानात वाढ दिसली. दौंड तालुक्‍यातील सर्वात निच्चांकी टक्‍केवारी वाढत गेली. दुपारी एकपर्यंत दौंड मतदारसंघात अवघ्या दोन तासांत 17 टक्‍के मतांचा टक्‍का वाढला. पुरंदर- हवेली मतदारसंघात 16 टक्‍के मतदान वाढले.

चार मतदारसंघ चाळिशीच्या आसपास – 
जिल्ह्यातील बारामती, खेड- आळंदी, शिरूर- हवेली विधानसभा मतदारसंघात मतदानात चुरस निर्माण झालेली होती. या तीन मतदारसंघात दुपारी एकपर्यंत चाळीच्या जवळपास टक्‍केवारी पोहोचलेली होती. भोर मतदारसंघात दुपारी एकपर्यंत 37. 61 टक्‍के मतदान झाले. बारामती मतदारसंघात दुपारी एकपर्यंत 37.61 टक्‍के मतदान झाले. खेड- आळंदी मतदारसंघातील तिरंगी लढतीत 32.21 टक्‍के मतदान झाले. शिरूर- हवेली तालुक्‍यात 29.92 टक्‍के मतदान झाले. बारामती मतदारसंघात 37.61 टक्‍के मतदान झाले. त्यामुळे या चार मतदारसंघात टक्‍का चाळीशीजवळ पोहोचलेला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.