सुपा ग्रामपंचायतीच्या दोन जागांसाठी आज मतदान

सुपा -पारनेर तालुक्‍यातील सुपा ग्रामपंचायतीच्या तीन जागा रिक्त झाल्या होत्या. त्यापैकी एक जागा बिनविरोध झाल्याने दोन जागांसाठी उद्या (दि.23) मतदान होत आहे. दोन जागांसाठी चार उमेदवार रिंगणात उतरले आहेत.

सुप्याचे विद्यमान सरपंच भाऊसाहेब पवार यांच्या निधनाने व दोन सदस्य अपात्र ठरल्याने तीन जागा रिक्त झाल्या होत्या. त्यातील एक जागा बिनविरोध झाली. दोन जागांसाठी मतदान होत आहे.

उपसभापती दीपक पवार, उपसरपंच राजू शेख यांच्या मार्गदर्शनाखाली कै. भाऊ पवार यांचे बंधू दत्तात्रय पवार व हेमलता पवार या निवडणूक लढत आहेत, तर बाजार समितीचे संचालक विजय पवार व सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शरद बाबासाहेब पवार व बाबासाहेब माधव पवार हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. मतदानासाठी अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक राहिल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.