पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – वकिलांची शिखर संघटना असलेल्या पुणे बार असोसिएशनच्या वार्षिक निवडणुकीसाठी बुधवारी (दि. २१) होणार आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत शिवाजीनगर न्यायालयात ही प्रक्रिया होईल. यानंतर मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
अध्यक्षपदासाठी दुहेरी निवडणूक होत आहे. अॅड. अमित गिरमे आणि अॅड. संतोष खामकर यांच्यात ही निवडणूक होणार आहे. तर उपाध्यक्ष पदाच्या दोन जागांसाठी मोठी चुरस आहे. तब्बल सात जण नशीब अजमावत आहेत. त्यामध्ये अॅड. समीर भुंडे, अॅड. शिरीषकुमार देशमुख, अॅड. अमेय देशपांडे, अॅड. पवन कुलकर्णी, अॅड. संजय पाटणकर, अॅड. कुमार पायगुडे, अॅड. मयुर साळुंके यांचा समावेश आहे.
सचिव पदांच्या दोन जागांसाठीची लढत सहा जणामध्ये होत आहे. अॅड. चेतन हरपळे, अॅड. अभिषेक जगताप, अॅड. मकरंद मते, अॅड. प्रभाकर सोनवणे, अॅड. अरविंद तायडे, अॅड. गणेश थरकुडे हे निवडणूक रिंगणात अहेत. तर, खजिनदारपदी अॅड. प्रदीप चांदेरे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
ऑडीटर पदासाठी अॅड. श्रध्दा कदम, अॅड. अजिंक्य खैरे, अॅड. केदार शितोळे यांच्यात निवडणूक होणार आहे. दहा कार्यकारिणी सदस्यांची यापूर्वीच सर्वानुमते निवड झाली आहे. निवडणुकीसाठी मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून दादाभाऊ शेटे, निवडणूक आयुक्त म्हणून एन. डी. पाटील काम पाहत आहेत