आळंदी,(वार्ताहर) – आळंदीतील इंद्रायणी कॅन्सर हॉस्पिटलसमोर ट्रकने दिलेल्या जोरदार धडकेत महिला जागी ठार झाली. नेहा पांडुरंग जोशी (वय 23, रा. केकनाका मुलुंड) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
धडक दिल्यानंतर चालक ट्रक (एमएच 14 सीपी 3181) सोडून पळून गेला आहे अशी माहिती पोलिसांनी दिली. याबाबत महेश लोखंडे (रा. तळेगाव दाभाडे) यांनी फिर्याद दिली आहे. आळंदीतील अपघाताची दुसरी घटना आहे. भरधाव वेगाने चालणार्या गाड्या तसेच आळंदीतील अंतर्गत आणि मुख्य रस्त्यावर जागोजागी अनधिकृत पणे पार्किंग असलेल्या गाड्यांमुळे अपघाताचा धोका सतत जाणवत असतो.
आळंदी पोलीस स्टेशन यांना बेकायदेशीर पार्किंग करणार्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी आवश्यक असलेल्या साधनांची त्रुटी हा या मागचा मोठा अडथळा मानला जात आहे. याच आठवड्यामध्ये वडगाव रोड येथे पद्मावती रोडवर धुमाळ नावाच्या परिचारिकेचा अपघाती मृत्यू झाला होता.
बधुंदपणे चालणार्या गाड्या तसेच बेशिस्तपणे रस्त्यावर पार केलेल्या गाड्यांमुळे वेळोवेळी अपघात होत असतात यामुळे अपघातात वाढ होत आहे का? हाही प्रश्न निर्माण झालेला आहे. ट्रक डंपर अवजड वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीत अडथळा निर्माण होतो या वाहनांना परवानगी नसतानाही ती रस्त्यावर धावताना दिसतात.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ट्रक चालक हा आळंदीहून चाकणला जात होता त्यावेळी यांच्या सहकारी महेश लोखंडे यांच्याबरोबर दुचाकीवरून जात होते मागून दिलेल्या धडकेने मृत्यू झाला आणि लोखंडे गंभीर जखमी झाले आहे. दरम्यान ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.