मुंबई – कालच मारुती सुझुकी कंपनीने कच्च्या मालाच्या किमती वाढत असल्यामुळे दरवाढ जाहीर केली होती. आता जर्मन कार उत्पादक फोक्सवॅगन कंपनीने आपल्या उत्पादनाच्या किमती वाढविणे असल्याचे जाहीर केले आहे.
ही दरवाढ 1 सप्टेंबर पासून लागू होणार असून या कंपनीच्या काही कार तीन टक्क्यापर्यंत महाग होणार असल्याचे सांगण्यात आले. या कंपनीने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सध्याच्या देशांतर्गत आणि जागतिक बदललेल्या परिस्थितीमध्ये कच्चा माल महाग होत असल्यामुळे आम्हाला उत्पादनाच्या किमती वाढवाव्या लागत आहेत. मात्र ज्या ग्राहकांनी 31 ऑगस्ट पूर्वी नोंदणी केली आहे अशा ग्राहकांना त्यांच्या कार जुन्या किमतीमध्ये उपलब्ध होणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.