नवी दिल्ली – कच्च्या मालाचे दर वाढल्यामुळे होंडा कार्स इंडिया या कंपनीने दरवाढ करण्याचे ठरविले आहे.
यासंदर्भात कंपनीने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, गेल्या काही दिवसापासून पोलाद, ऍल्युमिनीयम आणि इतर कच्च्या मालाचे दर एकतर्फी वाढत आहेत. त्यामुळे आम्हाला दरवाढ करण्याशिवाय पर्याय नाही.
ही दरवाढ ऑगस्ट महिन्यापासून लागू केली जाण्याची शक्यता आहे. या अगोदरच बऱ्याच वाहन कंपन्यांनी दरवाढ जाहीर केली आहे. आगामी काळातही बऱ्याच कंपन्या अशी दरवाढ जाहीर करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.