नवी दिल्ली : ढाक्यामध्ये विवेकानंद भवन उभारले जाणार असा ठराव पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यात झाला आहे. ढाका येथील रामकृष्ण मिशन विवेकानंद भवनाचा प्रकल्प उभारला जाणार. या दोन महान व्यक्तींचे आयुष्य आपल्याला कायम प्रेरणा देतील, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. आपला समाज आणि मूल्यांवर स्वामी रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद यांचा प्रभाव आहे. त्यामुळेच विवेकानंद भवन ढाका येथे उभारण्यात येणार आहे. या भवनामध्ये 100 हून अधिक विद्यापीठांमधील विद्यार्थी संशोधन स्कॉलर्सना राहण्याची संधी उपलब्ध होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात पार पडलेल्या या करारानंतर या दोघांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. मागील वर्षभरात भारत आणि बांगला देश यांच्या 12 संयुक्त प्रकल्पांचे उद्घाटन करण्याची संधी मला मिळाली. दोन्ही देशांमधली एअर कनेक्टिव्हिटी वाढणार आहे ही बाबही समाधानकारक आहे, असेही मोदी म्हणाले. दरम्यान, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना या गुरुवारपासून चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आल्या आहेत. लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर शेख हसीना यांचा हा पहिलाच दौरा आहे.